Wednesday, November 25, 2009

तेलाची कमतरता आणि शेती

अन्नधान्याची कमतरता, शेतीवरचं वाढतं संकट, तिसऱ्या जगातल्या गरीब देशांचं शोषण या विषयावर जितका अधिक अभ्यास करू तितकं अधिक भयावह चित्र समोर येतं. आणि बहुतेक सगळ्या विश्लेषकांचा निष्कर्ष एकच असतो, मुक्त बाजारपेठेचं हे मोकाट सुटलेले वारू असंच उधळत राहिलं, तर संपलोय आपण!

http://www.monthlyreview.org/091019kirschenmann.php

हा लेख वाचला. लेख आहे शेतीमध्ये आज आवश्यक असलेल्या ऊर्जेसंदर्भात. आजची औद्योगिक शेती ही मोठ्या प्रमाणात अश्म इंधनावर, पेट्रोलियमवर अवलंबून आहे. पाणीपुरवठा, खते, कीटकनाशके सगळंच. आणि म्हणूनच जेव्हा त्याची जेव्हा कमतरता निर्माण होईल तेव्हा शेती कशी कोलमडेल, याची चर्चा या लेखात आहे. लेखकाने उभे केलेले हे भीषण चित्र पहा – ‘जेव्हा तेलाची कमतरता निर्माण होईल, त्याची किंमत ३०० डॉलर प्रति बॅरल पेक्षाही जास्त होईल. अन्नधान्याचे उत्पादन करण्याकरता, त्यावर प्रक्रिया करण्याकरता आताच्या फक्त निम्मंच गोडं पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. हवामानातल्या बदलांमुळे नैसर्गिक संकटांचं प्रमाण दुप्पट झालं असेल आणि अन्नधान्य पिकवणे, पाणी वाचवणे, मातीचं पुनरुज्जीवन करणे, किंवा आजची आपली औद्योगिक अर्थव्यवस्था ज्या नैसर्गिक संसाधनांच्या जोरावर उभी आहे त्यांच्यावर अवलंबून नसणाऱ्या अर्थव्यावस्थेची कल्पना करणे या गोष्टींसाठी आवश्यक अशी कौशल्ये ज्यांनी मिळवलेली असतील अशा लोकांची संख्या अगदीच थोडी असेल.’
भयंकर वाटतं, पण आजूबाजूची परिस्थिती पहाता, असं होऊ शकते, याबाबत काही शंका वाटत नाही.
आज सगळे देश प्रगतीचं एकच मॉडेल डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहेत. आणि या मॉडेलचा जो अध्वर्यू आहे, अमेरिका, त्यांचा आदर्श ठेवून, त्यांच्याइतकं अन्नधान्य जगातल्या प्रत्येक देशाने रिचवायचं ठरवलं, तर जगातल्या कृषीव्यवस्थेला आजच्या ८ पट इतकं अन्नधान्य उत्पादित करावं लागेल.
आहे ना हास्यास्पद? म्हणूनच लेखकाच्या मते यावर उपाय एकच. संपूर्ण व्यवस्था रीडिझाईन करणं, संपूर्णतः नव्याने आखणं. आणि कृषीव्यवस्था नव्हे तर अर्थातच संपूर्ण आर्थिक, सामाजिक व्यवस्था. जर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला पुरेसं अन्न मिळालं पाहिजे एवढंच जरी हवं असेल तरीही हे करावंच लागेल.
हे रीडिझाईन कोण करणार? प्रवाहाबरोबर वहात जाणारे, साधं कम्प्यूटरवरचं एखादं सॉफ्टवेअर रीडिझाईन करायलासुद्धा कंटाळणारे, त्यापेक्षा तात्पुरती डागडुजी करून काम चालवू म्हणणारे आपण? अशीच डागडुजी करत राहिलो तर एक दिवस मानवजात डायनोसोर्सच्याच मार्गाने जाणार हे नक्की.

3 comments:

Anonymous said...

तुमच्या ब्लॉगवर अज़ून एक उत्तम लेख पहायला मिळाला. मी
lakshvedhak at gmail
पत्त्यावर दाद दिली, पण तो पत्ता अस्तित्वात नाही.

अशीच माहिती देत चला.
आभार.

Anagha said...

धन्यवाद. lakshvedhak at gmail सुरू केलंय. त्याच्यावर संपर्क करू शकता.

या विषयांवर अधिकाधिक लिहिलं, वाचलं, बोललं जायला हवं असं वाटतं.

Anant Bhide said...

Hello Anagha,

This is an old post but it is still relevant and would be for the coming decades. Personally, I feel we are great at coming up with ideas. It is the implementation that is ridiculously flawed. For example, the Constitution of India is probably the longest and the most extensive in the world. It has provision for almost everything and so does the Indian Penal Code. But we all know, as we say in Marathi, paani kuthe jirat aahe.

This post, like all others, was thought provoking.

Keep writing!